Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
दिवाळीच्या सुट्टीत एक आठवडासाठी आपल्या गावी जाणे
नोकरी धंद्यामुळे मुंबईकर झालो. तिथली गर्दी, धावधाव, सामाजिक विरक्ती असे काही रोजची दिनचर्या झालेली आहे. त्यामुळे कुठेही निघायचं विचार केलं तर डोक्याला ताण येतो. त्यातही जर आपले खेडेगावाकडे जाण्याचा विचार केला तर मुलं खेड्यात जायला सरळ नकार देतात. कारण शहरी सोय तिथे नाही. शहरात राहिलेले मुलांना गावाची ओढी नसते. त्यांना खेडेगाव म्हणजे बेकबर्ड क्षेत्र वाटतो या उलट जेव्हा माझे आई बाबा खेड्यातून मुंबईला येतात, इथलं दृश्य पाहून ते लवकरच परत जाण्याची घाई करतात. शहर त्यांना मुळीच आवडत नाही. माझ्या अतः करणात बरेच दिवसापासून एक प्रबळ इच्छा आहे की म्हातारपण, शेवटचे दिवस आपल्याच मातीत घालायचे. शेती पाहिली तर आनंदवाटेल. ज्या मातीने आपल्याला शिकवून-सवरून मोठं केलं, सबळ बनवलं, त्यामातीचे कर्ज याच नात्याने चुकवता येईल. म्हणून गावाचं राहतं घर कायम मेंटेन करून एकदम सुंदर ठेवलं आहे. नातेवाईकही तिथेच जवळपास असल्यामुळे त्यांनाही भेटण्याची तीव्र इच्छा असते.
यंदा आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी आपल्या खेडेगावी जाऊ या अशी घरात सल्ला केली. मुलं पुन्हा तयार नाही झाले, पण त्यांच्यासमोर गावाचे निसर्गसौंदर्याचे वर्णन केल्यावर त्यांची त्याला पाहण्याची इच्छा जगली. दिवाळीच्या सुट्टी लागण्याच्या दिवशी आम्ही सहपरिवार दुपारी आपल्या वाहनाने खाण्यापिण्याचे सोय करून आपल्या गावाकडे निघालो. बरोबर सहा तासात आपल्या गावी पोहचलो. घरी पोहचल्यावर आम्ही आई-बाबांचा आशीर्वाद घेतला. चहापाणी झाल्यावर आपल्या नातेवाईकांना भेटायला निघालो. वाटेत बालमित्र राजेश जोशीकडे बसलो. तेथे बराच वेळ आमची मैफिल जमली. नातेवाईकांनकडे गप्पागोष्टी, बरेच विषयांवर चर्चा. मग शेवटी जेवणाचा आग्रह न टाळता केव्हा सायंकाळचे आठ वाजले, कळलेच नाही. जेवण करून आम्ही आपल्या गावातल्या घरात आलो. प्रवासात दमलो म्हणून लवकर झोपलो. सकाळी लवकर उठलो. चला गावाचा एक फेरफटका मारायचा असं ठरवलं, तेवढ्यात मुलांनी गावाचे निसर्गसौंदर्य पाहण्याची आठवण करून दिली. आम्ही घाईत चहा पिऊन घराबाहेर पडलो. गावाचा पूर्ण चक्कर लावण्याचं ठरवलं. गावाचे वातावरण शहरापासून अगदी वेगळे. चहुकडे हिरवेगार शेत, मोठ-मोठी झाडे, सर्वत्र शांतता, शहरासारखी कोलाहल नाही, नैसर्गिक ठंडावा, शुद्ध वातावरण, सह्माद्री पर्वताने घेरलेले, समोर एक किमी. वर समुद्रतट, जलश्रोत, समुद्राचा लल्लाट आवाज, पाण्याची कलकल, सदाकदा न सांगता जोरात येणारा पाऊस आणि समुद्रतटावर सतत येणारे पर्यटकांची गर्दी, सुंदर जलवायू असलेले असे हे गावाचे चित्रण. हे सर्व पाहून मुलं खूप आनंदीत झाले. अशे दृश्य त्यांना कधीच पाहायला नाही मिळाले. हे गाव निसर्गाचं अगदी प्रत्यक्ष उदाहरण आहे. गावाचे लहान सुंदर घरे, सडा, रांगोळी, शेताचे मळे, त्यात काम करणारे शेतकरी, शांत वातावरण, शहरासारखी दगदग नाही, गर्दी नाही रस्त्याभर प्रत्येक येणारे-जाणारेची राम-राम. खरोखरच! गावात मिळणारा मनसुख शहरात नाही. गाव निसर्गाने भरलेलं आहे. पर्यावरण संतुलन हे शहरापेक्षा गावात जास्त आहे. निसर्गाचं अनुपम सौंदर्य आमच्या गावात दिसते. ‘जगा आणि जगु द्या’ ही म्हण आमच्या गावासाठी अगदी खरी ठरते. निसर्गाचं सुंदर स्वरूप आम्ही आपल्या गावात अनुभवत आहे. निसर्ग खऱ्या अर्थाने गावाचा सोबती आहे. एवढ असूनही लोकं शहराच्या भौतिक सुखासाठी पळत आहे. शेवटी गावाचे सुप्रसिद्ध शिव मंदिराचे दर्शन व एखाद तास समुद्रतटावर घालून आम्ही परत गावाच्या घरात आलो. दिवाळीच्या सुट्टीत गावाच चांगला अनुभव घेऊन व अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहून मुंबईला परत येऊन आपल्या कामात गुंतलो. मुलांची तर एकप्रकारे न विसरणारी सहलच झाली. ‘बाबा, परत गावाला केव्हा चलायचं?’ असे परत-परत प्रश्न विचारायचे.
शेवटी मला एवढेच म्हणायचे!
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती।
तेथेकर माझी जळती॥’