English

खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यावी, ते थोडक्यात लिहा. मुलाखतीची सुरुवात ........... मुलाखतीचा मध्य ........... दिमाखदार ........... संवादाला मुलाखतीचा समारोप .......... श्रोत्यांपर्यंत मुलाखत - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यावी, ते थोडक्यात लिहा.

मुलाखतीची सुरुवात ........ मुलाखतीचा मध्य ........ दिमाखदार ........ संवादाला मुलाखतीचा समारोप ........ श्रोत्यांपर्यंत मुलाखत ......... पोहोचणे.

Answer in Brief

Solution

  • मुलाखतीची सुरुवात: मुलाखतीचा प्रारंभच मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या/वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या चार-सहा वाक्यांतच श्रोते/वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात/ वाचनात मनाने पूर्णत: गुंतले गेले पाहिजेत. 'वेल बिगन इज हाफ डन्‌' असे जे म्हणतात ते याच अर्थाने. मॅचच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट सीमारेषेबाहेर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडले पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श होता कामा नये. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली नेमकी माहीत असली पाहिजे. 
  • मुलाखतीचा मध्य: विचारायच्या प्रश्‍नांची यादी तर समोर आहेच. त्यांचा क्रमही पक्का आहे. उत्तरे काय मिळतील याची मात्र खात्री नाही. शिवाय एक प्रश्‍न, मग त्याचे पूर्ण उत्तर, नंतर दुसरा प्रश्‍न, त्याचे पूर्ण उत्तर, तिसरा, चौथा... या पठडीतून जात राहिले तर मुलाखत रुक्ष, पठडीछाप होण्याची भीती असते. म्हणून मग प्रश्‍नच असे लवचीक तयार करायचे, की मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्‍न तयार करता आला पाहिजे. कौशल्यच आहे हे, थोडीशी आयत्या वेळची कसरतच; पण सरावाने ती जमते. प्रश्‍नांची यादी मुलाखतकारासाठी असते, श्रोत्यांसाठी नसते.
  • दिमाखदार: ही अशी प्रश्‍नोत्तरांची रंगीबेरंगी फुले एकामागे एक मुलाखतीच्या धाग्यात गुंफत गेले, की ती एक सलग दिमाखदार संवादमाला होऊन जाते. प्रश्‍नांतून उत्तरे, उत्तरांतून प्रश्‍न, प्रश्‍नांची उत्तरे, उत्तरांचे प्रश्‍न... बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडत जातात. मात्र हे करताना मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये. मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंजक असावी, असलीच पाहिजे; पण रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्‌दिष्टच भरकटता कामा नये.
  • मुलाखतीचा समारोप:इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते; पण आता कुठेतरी थांबायलाच हवे; पण हे थांबणे म्हणजे कळसाध्याय असला पाहिजे. इथेच मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना, “अरेरे, फारच लवकर संपली मुलाखत!' असे वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वत:साठी थोडासा जास्त वेळ घेतला तरी चालेल. प्रश्‍नांऐवजी परिणामकारक, प्रभावी निवेदन या क्षणी अधिक महत्त्वाचे असते. मुलाखत योग्य वेळी, योग्य ठिकाणी संपवावी. योग्य वेळ कोणती ? तर अशी वेळ, की त्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीहवीशी वाटत असतानाच संपावी; पण “ती अपूर्णच, अर्धवटच राहिली' अशा स्थितीतही संपू नये. भरभरून मिळाल्याचे समाधान तर श्रोत्यांना मिळावेच; पण 'अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असते तरीही चालले असते', असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप.
  • श्रोत्यांपर्यंत मुलाखत प्रभावीपणे पोहोचणे:  'पुन्हा कधी हा असाच वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच', असा निश्‍चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजेत. बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर पडले, की समजावे 'मुलाखत यशस्वी झाली; श्रोत्यांपर्यंत पोहोचली.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×