Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्द्यांवर दोन-तीन वाक्यांत माहिती लिहा.
Solution
सदाचा गाडगीमडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता सदाला गजानन नावाचा मुलगा होता. एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा हट्ट धरला. त्याच वेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला. त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंडारात लपून बसला होता. गाढवाला शोधत शोधत सदा काळोखात त्या खिंडारात आला. वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला. सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचक अंधारीबद्दल कळले होते. तिची भीती वाघाच्या मनात होती. सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचकअंधारीच बसली आहे. म्हणून वाघ भयंकर घाबरला. सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे, हे कळले तेव्हा तोही खूप घाबरला. अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोघांचीही घाबरमुंडी उडाली. या परिस्थितीतून सदा स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता. तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर तो चढून गेला. पाठीवरून गचतअंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला.