Advertisements
Advertisements
Question
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
Solution
कवी नारायण सुर्वे जिथे राहत होते तिथे त्यांच्या आजुबाजूला सगळी गोरगरिबांचीच वस्ती होती. सगळ्यांचे जीवन हालअपेष्टांनी भरलेले होते. कवी नारायण सुर्वे यांना आजुबाजूच्या समाजबांधवांचे दुःख पाहवत नव्हते. स्वतः दुःखी-कष्टी असूनही त्यांनी नेहमी इतरांच्या दुःखाचा विचार केला. प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचार केला. मान-अपमान, बरे-वाईट, सुख-दुःख सगळं सगळं पचवून ते संपूर्ण जगाशी एकरूप झाले. जगातल्या अनेक बऱ्या-वाईट घटनांशी ते समरूप झाले. जगाच्या या शाळेत दु:ख कसे सहन करावे, दुःखावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने जीवनाला कसे सामोरे जावे. हसत हसत कसे जगावे ते याच जगाच्या शाळेने त्यांना शिकवले. म्हणजेच या जगानेच त्यांना दु:खही दिले आणि या जगानेच दु:ख विसरून आनंदाने कसे जगावे हे देखील शिकवले.