Advertisements
Advertisements
Question
खालील ओळींचे रसग्रहण करा.
रे थांब जरा आषाढघना बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा कोमल पाचूंचीं हीं शेतें प्रवाळमातीमधलीं औतें इंद्रनीळ वेळूंचीं बेटें या तुझ्याच पदविन्यासखुणा रोमांचित ही गंध-केतकी फुटे फुलीं ही सोनचंपकी लाजुन या जाईच्या लेकी तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा |
Solution
आशयसौंदर्य: कवी बा. भ. बोरकर यांच्या 'रे थांब जरा आषाढघना' या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत. आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते. या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढ मेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत.
काव्यसौंदर्य: आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत. त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात - हे आषाढमेघा, जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे. कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते, पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी, नुकतीच उमललेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली, तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत. अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा.
भाषा वैशिष्ट्ये: उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे. आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे. विशेष म्हणजे 'आषाढघन, केतकी, सोनचाफ्याची कळी, जाईची फुले' यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी अंत:करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे. निसर्ग आणि मानव यांतील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे. 'लाजणाऱ्या जाई नि रोमांचित होणारी केतकी' यातला हृदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो. नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे शोधा.
कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
शेतातील हिरवीगार पिके - ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती- ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द- ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द- ______
एका शब्दात उत्तर लिहा.
रोमांचित होणारी-
एका शब्दात उत्तर लिहा.
नव्याने फुलणारी-
एका शब्दात उत्तर लिहा.
लाजणाऱ्या-
कृती करा.
कवीने आषाढघनाला करायला सांगितलेली काम
कृती करा.
जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) काळोखाची पीत आंसवे | (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहत |
(२) पालवीत उमलतां काजवे | (आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत |
(३) करूं दे मज हितगूज त्यांसवें | (इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत |
(४) निरखीत जळांतिल विधुवदना | (ई) मला गुजगोष्टी करू दे |
खालील ओळींचा अर्थलिहा.
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
अभिव्यक्ती.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
अभिव्यक्ती.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर...’ या विषयावर निबंध लिहा.
काव्यसौंदर्य.
आश्लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.