त्सुनामी म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावरील अचानक हालचालीमुळे निर्माण होणाऱ्या लाटा होय. या हालचाली समुद्राच्या तळाशी भूकंप, भूस्खलन, जमिनीचा समुद्रात कोसळणं, मोठे ज्वालामुखी स्फोट किंवा महासागरात उल्कापिंड पडल्यामुळे होतात. त्सुनामीमुळे मानवी जीवन आणि उपजीविकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच नैसर्गिक संसाधनांचाही नाश होतो.