Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- स्व-आवड आणि सामाजिक आवड समजून घेणे: तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पध्दतीनुसार 'स्व-आवडी सांभाळा आणि इतरांच्या आवडी ओळखा' हे या उपचार पद्धतीचे ते जणू घोषवाक्य आहे. तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःसाठी चांगले काय आहे हे समजू शकतात आणि कशामुळे त्यांचा विकास होऊ शकतो हे जाणतात. त्या निर्णयाची जबाबदारी ते स्वीकारतात. पण त्याचवेळी इतर व्यक्तींचे अधिकार दुर्लक्षिले जाणार नाहीत याची ते काळजी घेतात व आपल्या समाजाच्या रक्षणासाठी मदत करतात.
- स्व निर्देश: तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वत:च्या जीवनाची जबाबदारी स्वतः प्राथमिकतेने उचलतात. इतरांकडून अतिरेकी स्वरूपात आधाराची किंवा पोषणाची गरज किंवा मागणी ते करीत नाहीत.
shaalaa.com
तर्कसंगतीचे महत्त्व
Is there an error in this question or solution?