Advertisements
Advertisements
Question
खालील प्रसंग अभ्यासा.
स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना. |
खालील प्रश्नांच्या उत्तरातूत प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा.
- प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे, यांचाकाही संबंध आहे का?
- यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्यां लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा.
- प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का?
Solution
- होय, प्रकाशाच्या परावर्तनाचा आणि प्रतिमा अस्पष्ट होण्याचा (धूसर होण्याचा) संबंध आहे.
-
सुरुवातीला पाणी स्थिर होते आणि त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होता. त्यामुळे नियमित परावर्तन (Regular Reflection) होत होते, म्हणजेच स्वरा किंवा यशच्या शरीरावरून येणारे सर्व प्रकाशकिरण पाण्याच्या पृष्ठभागावर एकसारख्या दिशेने परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत होते. त्यामुळे आपल्याला स्पष्ट प्रतिमा दिसत होती.
परंतु, जेव्हा यशने पाण्यात दगड टाकला, तेव्हा पाण्याचा पृष्ठभाग असमतल (खडबडीत) झाला, ज्यामुळे अनियमित परावर्तन (Irregular Reflection) होऊ लागले. म्हणजेच, स्वरा किंवा यशच्या शरीरावरून येणारे प्रकाशकिरण पाण्याच्या पृष्ठभागावर विविध दिशांनी परावर्तित झाले आणि फक्त काही परावर्तित किरण आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचले.
यामुळेच आपल्याला अस्पष्ट (धूसर) प्रतिमा दिसते.
- होय, परावर्तनाच्या दोन्ही प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात.