Advertisements
Advertisements
Question
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.
संयोग अभिक्रिया
Solution
जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात.
उदा.,
(१) मॅग्नेशिअम (Mg) धातूची फीत जाळली असता, हवेतील ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साइडची (MgO) ची पांढरी भुकटी हे एकमेव उत्पादित तयार होते.
\[\ce{\underset{\text{मॅग्नेशियम}}{2Mg_{(s)}} + O2_{(s)} ->[उष्णता] \underset{\text{मॅग्नेशियम ऑक्साइड(पांढरी भुकटी)}}{2MgO_{(s)}}}\]
(२) प्रयोगशाळेत लोखंड व गंधक यांच्यात अभिक्रिया होऊन आयर्न सल्फाइड हे एकमेव उत्पादित तयार होते.
\[\ce{\underset{\text{आयर्न}}{Fe_{(s)}} + \underset{\text{गंधक}}{S_{(s)}} -> \underset{\text{आयर्न सल्फाइड}}{FeS_{(s)}}}\]
(३) अमोनिया वायू (NH3) व हायड्रोजन क्लोराइड वायू (HC1) यांच्यात अभिक्रिया अमोनियम क्लोराइड वायूरूप तयार होऊन लगेच त्याचे रूपांतर स्थायुरूपात होते.
\[\ce{\underset{\text{अमोनिया}}{NH3↑} + \underset{\text{हायड्रोजन क्लोराइड}}{HCl↑} -> \underset{\text{अमोनियम क्लोराइड(एकच उत्पादित)}}{NH4Cl_{(s)}}}\]