Advertisements
Advertisements
Question
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
अंधश्रध्दा-मानसिक प्रथमोपचारातील अडथळा
Answer in Brief
Solution
- काही व्यक्तींचा असा विश्वास आहे की मानसिक आजार हे पापांमुळे आणि अदृश्य शक्तीमुळे होतात. त्यामुळेते सहजासहजी वैद्यकीय व्यवसायिक तज्ञांंकडे जाण्यास तयार होत नाहीत. ते असा विचार करत नाहीत की हा आजार अत्याधुनिक औषधोपचार आणि मानसोपचाराने बरा केला जाऊ शकतो आणि म्हणूनच ते अप्रशिक्षित व्यवसायिक तज्ञांकडे जाणे पसंत करतात.
- मानसिक आरोग्यातील प्रथमोपचार ही “उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला” यावर आधारित कल्पना आहे. मानसिक आजार सामान्यतः अनपेक्षितपणे अथवा पूर्वसूचनेशिवाय निर्माण होत नाहीत. बऱ्याचदा असे छोटे किंवा सूक्ष्म बदल होतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की काहीतरी चूकीचे घडत आहे. सभोवतालच्या व्यक्तींना असे वाटते की त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये किंवा वर्तनामध्ये बदल होत आहे.
shaalaa.com
मानसिक आरोग्य प्रथमोपचाराची गरज
Is there an error in this question or solution?