Advertisements
Advertisements
Question
खालील तक्ता पूर्ण करा.
वाक्य | वाक्यप्रकार | सूचनेनुसार बदल करा. |
(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! | _________ | विधानार्थी करा. |
(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. | _________ | उद्गारार्थी करा. |
(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. | _________ | प्रश्नार्थक करा. |
(ई) ते काम खूप मोठे आहे. | होकारार्थी | नकारार्थी करा. |
(उ) प्रवासात भरभरून बोलावे. | _________ | आज्ञार्थी करा. |
(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? | _________ | विधानार्थी करा. |
Solution
वाक्य | वाक्यप्रकार | सूचनेनुसार बदल करा. | |
(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! | उद्गारार्थी | विधानार्थी करा | ताजमहाल खूपच सुंदर आहे. |
(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. | विधानार्थी | उद्गारार्थी करा | किती आनंद झाला तुझ्या भेटीने! |
(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. | विधानार्थी | प्रश्नार्थक करा | शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी कमी का केले आहे? |
(ई) ते काम खूप मोठे आहे. | होकारार्थी | नकारार्थी करा | ते काम लहान नाही. |
(उ) प्रवासात भरभरून बोलावे. | विधानार्थी | आज्ञार्थी करा | प्रवासात भरभरून बोला. |
(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? | प्रश्नार्थी | विधानार्थी करा | पांढरा रंग सगळ्यांनाच आवडतो. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
व्याकरण.
खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
शाल व शालीनता यांचा संबंध काय?
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तुझा आवाका खूपच मोठा आहे.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
निबळ्यांच्या निरीक्षणाची संधी का घालावली?
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
केवढी उंच ही इमारत! (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (नकारार्थी करा)
सूचनेप्रमाणे सोडवा:
पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)