Advertisements
Advertisements
Question
खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
वनस्पतींमध्ये अखंड चोवीस तास पाणीपुरवठा होत असतो. घरातल्या नळाला जसं पाईपलाईनने पाणी पुरवलं जातं. तसं वनस्पतींमध्येही अनेक छोटे पाईप (झायलेम) एकमेकांवर बसवलेले असतात. त्यामुळे मुळांमध्ये जमिनीतून शोषलेलं पाणी या लांबलचक तयार झालेल्या पाईपद्वारे झाडांच्या शेंड्यापर्यंतही पुरवलं जातं. वनस्पतींमधलं स्वयंपाकघर म्हणजे हिरवी पानं! हरितद्रव्याच्या साहाय्यानं, सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानं अन्न तयार करतात. ते विशिष्ट प्रकारच्या पेशींमधून (फ्लोएम) झाडाच्या इतर भागांपर्यंत पोहोचवलं जातं, त्या-त्या भागात अन्नावर प्रक्रियाही होते. याशिवाय गरजेनुसार या पेशींशिवाय अनेक पेशी असतात. त्यांची कामंही निरनिराळी असतात. काही वनस्पती पाण्यात राहूनही भिजत नाही; कारण त्यांच्या पेशींवर मेणाचा थर असतो. काही पाण्यात तरंगतात, कारण त्यांच्यात हवेच्या पिशव्या असतात. अशा अनेक विविध प्रकारच्या पेशी वेगवेगळ्या झाडात त्यांच्या गरजेनुसार आणि झाडांच्या गुणधर्मानुसार असतात. |
Short Note
Solution
वनस्पतींमध्ये अनेक छोटे पाईप (झायलेम) असतात. त्याद्वारे घरातील नळाप्रमाणे वनस्पतींना अखंड पाणीपुरवठा होतो. म्हणून जमिनीतील पाणी शेंड्यापर्यंत पुरविले जाते. झाडाची पाने हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाने अन्न तयार करून विशिष्ट पेशीद्वारे (फ्लोएम) झाडाच्या इतर भागांना पोहोचवितात. म्हणून पानांना स्वयंपाकघर म्हणतात. झाडाच्या त्या-त्या भागात अन्नावर प्रक्रिया होते. याशिवाय इतर पेशीपण गरजेनुसार काम करतात. काही झाडे पाण्यात भिजत नाहीत; कारण पेशीवर मेणाचा थर असतो आणि काही झाडे पाण्यात तरंगतात. कारण पेशीमध्ये हवेच्या पिराव्या असतात. झाडांच्या गरजेनुसार व गुणधर्मानुसार अनेक पेशी असतात.
shaalaa.com
सारांश लेखन
Is there an error in this question or solution?