Advertisements
Advertisements
Question
खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. |
Short Note
Solution
मनुष्याच्या अंगी असलेल्या गुणांना व त्यांच्या कलेला पारखी ठेवण्यासाठी शिक्षणाची व परिश्रमाची नितांत आवश्यकता असते. विद्वानाच्या विद्वत्तेखाली असणाऱ्या गुणांना व त्याचबरोबर त्यांच्यात असलेल्या कलांना व त्याचबरोबर त्यांच्यात असलेल्या कलांना व वक्तृत्वाला जर इतर माणसांनी अनुकरण केला तर हा उत्तम मार्ग ठरेल. माझ्या अनुकरणात त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचारांची काळजी घेतली पाहिजे त्याशिवाय अनेक विषयांची माहिती प्राप्त करण्यासाठी सतत अध्ययनाची व शिक्षणाची आवड ठेवणे आवश्यक आहे.
shaalaa.com
सारांश लेखन
Is there an error in this question or solution?