Advertisements
Advertisements
Question
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)
(य) ______
(र) ______
(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)
(य) ______
(र) ______
सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’ पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो. |
(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)
पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.
Solution
(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे
(य) गुलमोहर
(र) जॅक्रांड
(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव
(य) अनोखा, लोमसवाणा
(र) नाजूक व तरल
(३) आपल्या सभोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला असतो असे लेखकाला वाटते. पहाट ही तशी रोज घडणारी घटना आहे. पहाट झाली की पाखरांचा बारीक-बारीक आवाज सुरू होतो. त्यांच्या हालचालींना सुरुवात होते. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे या प्रसंगात लेखकाला मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा तो बारीक आवाज म्हणजेच त्यांचे कुजबुजने होय. जनू ती एकमेकांना विचारत आहेत. पहाट झाली का? पहाटेचे हळुवार येणे पाहून लेखकाला वाटते की पहाटचा या पाखरांना हळुच विचारते की “मी येऊका?” त्या दोघांमधील हे कोमळ नाते. या वाक्यातून लेखकाला व्यक्त करायचे आहे.
किंवा
पहाटे लवकर उठणे तसे आता जुनी कल्पना असल्यासारखे लोक वागत असतात. पहाटे लवकर उठणाऱ्या व्यक्तींना चांगले आरोग्य लाभते. आम्ही एक दिवस मुक्कामासाठी किल्ले हरिश्चंद्र गडावर गेले होतो. गडावर पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न आणि ऊर्जा देणारी असते. मनाला मोहवणारी आल्हाददायक पहाट आपल्याला दिवसभराच्या कामासाठी एक वेगळीच ऊर्जा देते. नुकताच पावसाळा संपला असल्याने आकाश निरभ्र होते. पहाट होताच सगळीकडे पसरलेला. काळोखाचा पडदा हळूहळू विरळ होत जातो. वाऱ्याची मंद शीतल झुळूक आपल्या अंगाला मोहरून टाकते. संपूर्ण गडावरील वातावरण अगदी प्रसन्न आणि उल्हासदायक असते. गडाच्या कडा कपाऱ्यातील झाडांवरील पक्षी जणू आपल्याला झोपेतून जागे करण्यासाठीचा किलबिलाट करत आहे असे वाटते. उंचावरील थंड हवा आपल्याला प्रसन्न करून जाते. सगळीकडे असणारी हिखाई पहाटेच्या प्रकाशात पाहण्याची अपूर्वाई काही वेगळीच असते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृती करा.
उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये
कृती करा.
घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन
कारणे शोधा व लिहा.
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण...
कारणे शोधा व लिहा.
मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण...
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
सायली -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
गुलमोहोर -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
जॅक्रांडा -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
चाफा -
वर्णन करा.
उत्तररात्रीचे आगमन
वर्णन करा.
पहाट व पाखरे यांच्यातील नात
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
वृक्ष-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
फुले-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
वेली-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
पाखरे-
स्वमत.
‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?...’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
स्वमत.
‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
अभिव्यक्ती.
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.