Advertisements
Advertisements
Question
खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा.
आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही.
Options
सत्य
असत्य
MCQ
True or False
Solution
हे विधान असत्य आहे.
स्पष्टीकरण:
- आपली निवडप्रक्रिया आणि संधींच्या उपलब्धतेवर आपल्या कुटुंबाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पालकांना आपल्या पाल्यास पोषक आहार देणे शक्य होईलच असे नाही. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या घटना आपण ऐकल्या असतीलच.
- ज्या लोकांकडे आर्थिक साधने कमी असतात त्यांच्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळवणे कठीण होते.
- आर्थिक विषमता जास्त असेल तर समाजातील सर्वसामान्य लोकांचा खरेदी क्षमता कमी होते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ त्याचा परिणाम होतो.
- आपणा सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. हा फरक आपली व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला, संगीत आणि अभिनयाचे गुण असू शकतात. तथापि, या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत या गुणांचा समाजहितासाठी विनियोग करता येणार नाही.
shaalaa.com
राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने
Is there an error in this question or solution?