English

खालील विधानांपैकी कोणते विधान लांब, सरळ विद्युतवाहक तारेजवळच्या चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते? स्पष्टीकरण लिहा. अ. तारेला लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानांपैकी कोणते विधान लांब, सरळ विद्युतवाहक तारेजवळच्या चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते? स्पष्टीकरण लिहा.

Options

  • तारेला लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात.

  • तारेला समांतर, तारेच्या सर्व बाजूंनी चुंबकीय बलरेषा जातात.

  • तारेला लंब व तारेपासून दूर (radially outward) अशा चुंबकीय बलरेषा जातात.

  • समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात.

MCQ
Answer in Brief

Solution

समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात. 

स्पष्टीकरण  : उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम :

 उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम

अशी कल्पना करा की, सरळ विद्युतवाहकता तुम्ही उजव्या हातात अशा रितीने पकडले आहे की, अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बल रेषांची दिशा होय.

shaalaa.com
विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम (Magnetic effect of electric current)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [Page 61]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q ८. | Page 61
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×