English

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. मागील ७५ वर्षांच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णत: बदल झाले. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.

मागील ७५ वर्षांच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णत: बदल झाले.

Options

  • सहमत

  • असहमत

MCQ
True or False

Solution

मी दिलेल्या विधानाशी असहमत आहे.

स्पष्टीकरण:

मागील ७० वर्षांच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णत: बदल झाले.

भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची व दिशेची वैशिष्ट्ये खालील-प्रमाणे आहेत.

  1. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा: १९९०-९१ मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा (आयात-निर्यात) हिस्सा १७.५५% होता. २००६-०७ मध्ये त्यामध्ये २५% इतकी वाढ झाली. तर २०१६-१७ मध्ये ही वाढ ४८.८% झाली.
  2. व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ: १९९०-९१ मध्ये भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झाली. भारत आता मोठ्या प्रमाणात अधिकमूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो.
  3. निर्यातीच्या रचनेत बदल: स्वातंत्रयाप्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेतही बदल झाला. स्वातंत्रयापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने उदा., ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने निर्यात करीत होता. काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत तयार कपडे, हिरे, माणके, इलेक्ट्रॉनिक वस्तू- विशेषत: संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकाविले आहे.
  4.  आयातीच्या रचनेत बदल: स्वातंत्रयापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रिकल वस्तू यांसारख्या उपभोग्य वस्तूंची आयात करीत होता. सद्य स्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी वस्तूंची आयात करतो.
  5.  सागरी व्यापार: भारताचा बहुतेक व्यापार हा सागरी मार्गाने होतो. नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. जवळपास ६८% व्यापार हा सागरी मार्गाने होतो.
  6. नवीन बंदरांचा विकास: भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कोलकता, चेन्नई या बंदरांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरांवर अतिरिक्त भार पडत होता. अलीकडे भारताने या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, नाव्हाशिवा इत्यादी नवीन बंदरे विकसित केली आहेत.
shaalaa.com
भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×