English

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: निर्देशांकाना कोणत्याही मर्यादा नाहीत. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:

निर्देशांकाना कोणत्याही मर्यादा नाहीत.

Options

  • सहमत

  • असहमत

MCQ
True or False

Solution

मी दिलेल्या विधानाशी असहमत आहे.

स्पष्टीकरण:

व्यवहारात निर्देशांक फार उपयोगी आहे. आर्थिक हालचालींचा तो वायुभारमापक आहे. पंरतु निर्देशांक संपूर्ण खात्रीशीर नाही. त्‍यावर पुढील मर्यादा येतात.

  1. नमुन्यावर आधारित: निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होत नाही. म्‍हणून तो नमुना चुकांपासून मुक्‍त होत नाही.
  2. आकडेवारींवर आधारित: निरनिराळ्या प्रकारच्या अपुऱ्या आकडेवारींवर निर्देशांक आधारित आहे. त्‍याच आधारावर आकडेवारी गोळा केली आहे. याचा परिणाम निर्देशांकाच्या निष्‍कर्षावर होतो.
  3. निर्देशांकाचा चुकीचा उद्देश: निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने वापरला जातो. मूळ वर्षातील परिस्‍थितीबरोबर चालू वर्षातील परिस्‍थितीशी तुलना केली जाते. म्हणून व्यक्‍ती मूळ वर्षाची निवड करते. परंतु त्‍याचा हेतू योग्‍य असला पाहिजे.
  4. सूत्राची उणीव: निर्देशांकाच्या रचनेसाठी अचूक सूत्र नाही. ही फक्‍त सरासरी आहे. त्‍यामुळे त्‍याला सरासरीच्या सर्व मर्यादा पडतात.
  5. अर्थव्यवस्‍थेतील बदल: देशातील लोकांच्या सवयी, आवडी आणि अपेक्षा नेहमीच बदलत असतात. त्‍या सर्व बदलांचा समावेश निर्देशांकात केला जात नाही.
  6. गुणवत्‍तेत बदल: वस्‍तूच्या गुणवत्‍तेत झालेल्‍या बदलाकडे निर्देशांक दुर्लक्ष करतो. चांगल्‍या वस्‍तूंना पर्याय असलेल्‍या सर्वसामान्य वस्‍तूपेक्षा दिलेल्‍या वेळेत चांगल्‍या दर्जाच्या वस्‍तूंचा उत्‍पादन खर्च जास्‍त असतो आणि किंमतही जास्‍त असते.
  7. बैजिक भार: निरनिराळ्या वस्‍तूंना दिलेला भार बैजिक असतो.
  8. मर्यादित व्याप्ती: निर्देशांकाला मर्यादित व्याप्ती आहे. कारण एका हेतूने तयार केलेले निर्देशांक दुसऱ्या कोणत्‍याही हेतूसाठी वापरले जात नाहीत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×