English

खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा. आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा.

आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये

Short Note

Solution

आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: 

  1. विज्ञाननिष्ठता: विज्ञाननिष्ठता म्हणजे कोणत्याही गोष्टीचे आकलन आणि स्पष्टीकरण करण्याची वैज्ञानिक पद्धती होय. वैज्ञानिक पद्धतींवर आधारलेल्या शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तीवादाचे समर्थन करण्यासाठी प्रात्यक्षिकांच्या आधारे मिळालेल्या पुराव्यावर भर देण्याने विज्ञाननिष्ठता विकसित होते.
  2. तर्कनिष्ठ दृष्टिकोन: याचा संबंध तर्कवादाशी आहे. तर्कवाद संकल्पनेत कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याचा दृष्‍टिकोन आणि क्षमता यांचा समावेश आहे. तर्कनिष्ठ विचारात व्यक्तिगत धारणा आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाला जागा नसते. तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक-धार्मिक मूल्यांवर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडून इहवाद आणि तर्कवाद यांवर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे झुकलेला कल स्पष्टपणे दिसतो.
  3. तंत्रज्ञानातील सुधारणा: आधुनिकीकरणाच्या अनेक व्याख्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर भर दिलेला दिसतो. त्यासाठी अचूकता मिळवण्याची तंत्रे, कौशल्यांचे विशेषीकरण आणि अचूकता या गोष्टींची आवश्यकता असते.
  4. नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्‍वातंत्र्य: समस्यांच्या निराकरणासाठी नवीन कल्पनांचे स्वागत करणे, उपलब्ध पर्यायांची पडताळणी करणे, नवीन मार्ग चोखाळणे, नवनिर्मितीच्या मार्गांचा शोध घेणे अशा गोष्टी स्वेच्छेने स्वीकारणे आवश्यक असते. आधुनिकीकरणाचा अर्थ आधुनिक यंत्रे आणि उपकरणांचा
  5. चिकित्सक विचारपद्धती: संबंधित गाेष्टीचे बारकावे समजून घेऊन त्यातील बऱ्या वाईट पैलूंचे परीक्षण करता येणे म्हणजे चिकित्सक विचारपद्धती. ज्या व्यक्ती आधुनिक आहेत असे म्हणता येईल. त्यांची रोजच्या घटना, साहित्य, संस्कृती, कला, रूढी, श्रद्धा इत्यादी सर्वच गोष्टींकडे चिकित्सक वृत्तीने पाहून त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेण्याची तयारी असते. आत्मपरीक्षण करणे म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तित्वातील बऱ्या-वाईटाचा शोध घेणे. हा गुणसुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग आहे.
shaalaa.com
आधुनिकीकरण
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×