English

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा. फॅशनचे वेड -

Advertisements
Advertisements

Question

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फॅशनचे वेड

Answer in Brief

Solution

फॅशनचे वेड

‘एवढे लांबसडक केस आहेत. उगीच फॅशनच्या मागे लागून कापू नको.’

‘मी कापणार! सध्या केस छोटे ठेवून ते मोकळे सोडण्याची फॅशन आहे. शिवाय स्वच्छता करण्यासाठी फार वेळ जाणार नाही.’

‘कर तुला काय करायचं ते’ तुझे केस आणि तू!

हा संवाद आहे आई आणि तिची कॉलेजात जाणारी मुलगी यांच्यातला. घराघरात असे संवाद वेगवेगळ्या विषयांवर थोड्याफार फरकाने होतच असतात. त्याचा शेवट ‘आमच्या वेळी असं नव्हतं’, ‘आजच्या पिढीला रोज नवी फॅशन हवी’,अशासारख्या उद्गारांनी होतो.

फॅशनचं वेड हे प्रत्येकाला विशिष्ट वयात असतंच. कारण ते नावीन्याचं वेड असतं. त्यातून आपला वेगळेपणा दाखविण्याचा प्रयत्न असतो. इतरांच्या नजरेत भरण्याचा खटाटोप असतो. म्हणून कपडे, केस, नखं, चपला, पर्सेंस यांच्या नित्यनव्या फॅशन्स निर्माण होत असतात आणि तरुणाईला त्या फॅशनचं वेड असतं. फॅशन जगतावर चित्रपटसृष्टीचा प्रभाव मोठा आहे. एखाद्या सिनेमात नायकाने किंवा नायिकेने घातलेले वेगळे कपडे, केस आणि दाढी यांची वेगळी रचनां लगेच फॅशन म्हणून उचलली जाते आणि सगळीकडे प्रचलित होते. मग ती आपल्याला चांगली दिसते की नाही, मानवते की नाही याचाही विचार कोण करीत नाही. आजकाल टी. व्ही. सारखं प्रसारमाध्यम नवनव्या फॅशनचे  जणू प्रसारकेंद्रच बनलं आहे. टी. व्ही. वरच्या मालिका त्यातली पात्रं जणू फॅशन शोमधले स्पर्धकच वाटतात. रोजच्या जीवनात वावरणारी हीं माणसं सुंदर-सुंदर कपडे आणि चेहऱ्याची रंगरंगोटी करून घरात २४ तास कशी राहतात, भांडतात, एकमेकांचा द्वेष करतात हे काही कळत नाही. खरं म्हणजे हा प्रचंड विनोद आहे. सारंच हास्यास्पद आहे. तरीही सामान्य प्रेक्षक त्या वातावरणात गुरफटून जातो. त्यांच्या बिंदीचीं आणि बांगड्यांची आणि डेसेसची चर्चा करत बसतो.

फॅशनचं वेड हे मात्र अगदी आदिमानवापासून आहे. काहीही साधने नव्हती तेव्हाही पाने-फुलांनी माणूस आपलं शरीर सजवीतच होता. वैचित्रय, नावीन्य यांची माणसाची आवड खूप जुनी आहे आणि मागची पिढी पुढच्या पिढीला फॅशनबद्दल नावं ठेवताना दिसली तरी त्यांनीही त्यांच्या तरुणपणी फॅशनसाठी आपल्या आई-वडिलांचा रोष ओढवून घेतला, हे तेही कबूल करतात. पिढीतल्या विचारांचं अंतर हे फॅशनच्या निमित्तान चांगलंच दिसून येतं. आई-वडिलांना फॅशन आवडली नाही तर ती चांगली, असं नवी पिढी समजते.

केव्हा कशाची फॅशन येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्या-त्याच फॅशन्स ठरावीक कालानंतर पुनःपुन्हा येताना दिसतात. याच्यामागे साधं मानसशास्त्रा आहे. त्याच-त्याच गोष्टीचा कंटाळा येतो आणि पुन्हा पूर्वीची गोष्ट चांगली वाटू लागते. पूर्वी फॅशनजगत फक्त स्त्रियांच्या भोवतीच रेंगाळत होतं. पण आज पुरुषांचे कपडे, त्यांची केशभूषा, अलंकार त्यांच्यासाठी फॅशन शो हे पाहिलं की, ‘सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे’ या समजुतीचा जमाना मागे घडल्याचं लक्षात येतं.

याचा फायदा व्यापारी लोकांना जास्त होतो. आता तर फॅशनमुळे लोकप्रिय झालेल्या गोष्टी झपाट्याने सगळीकडे पसरवायला टी. व्ही. आणि त्याच्यावरच्या जाहिरातींची मदत आहे. प्रचंड असं सिनेजगत आहे.

काही फॅशन मात्र वीभत्स, किळसवाण्या, सभ्यतेला सोडून असणाऱ्या असतात. काही फॅशन्स स्त्री-पुरुष भूमिकांची अदलाबदल करणाऱ्या असतात. मला वाटतं, पुरुषांनी केसांची पोनी बांधणं किंवा कानात बाळी घालणं आणि स्त्रियांनी जीन्स घालून अलंकारविरहित राहणं असं करताना फॅशन करणाऱ्या लोकांना परंपरागत कल्पनांना धक्का द्यायचा असतो. जीवनातला तोचतोपणा घालवायचा असतो. त्या दृष्टीने माफक प्रमाणात फॅशन ठीक आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करणं हेच सुज्ञपणाचं लक्षण आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×