English

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा. लोकशाही आणि निवडणुका -

Advertisements
Advertisements

Question

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका

Answer in Brief

Solution

लोकशाही आणि निवडणुका

अब्राहम लिंकत यांनी लोकशाहीची केलेली व्याख्या प्रसिद्ध आहे. “लोकांचे, लोकांनी चालविलेले व लोकांसाठी असलेले राज्य म्हणजे लोकशाही” लोकशाहीची बरीच वैशिष्ट्ये या व्याख्येत सामावलेली आहेत. यावरून लोकशाही आणि निवडणुका यांचा संबंध अत्यंत घनिष्ठ आहे, हेही लक्षात येतं, लोकांचं राज्य म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनी चालविलेलं राज्य त्यासाठी निवडणुका अपरिहार्यच आहेत.

भारतीय राज्यव्यवस्था संसदीय स्वरूपाची आहे. दर पाच वर्षांनी येथे निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा अशा मुख्य निवडणुका याशिवाय महानगर पालिकेसारख्या स्वायत्त संस्थांच्या निवडणुका, पदवीधर असलेल्यांना, पदवीधर मतदारसंघामधल्या निवडणुका, शिक्षक असलेल्यांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका, एखाद्या निवडून दिलेल्या आमदाराचा, नगरसेवकाचा मृत्यू झाल्यास होणाऱ्या पोटनिवडणुका अशा अनेक प्रकारच्या नगरसेवकाचा मृत्यू निवडणुकीचं वातावरण तरी असतं किंवा निवडणुकांची तयारी तरी सुरू असते. पाच वर्षासाठी म्हणून आपण प्रतिनिधी निवडून देतो. पण मदत पूर्ण होण्याच्या आतच संसद किंवा विधानसभा बरखास्त केली जाते आणि मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या जातात. बऱ्याच वेळा निवडणुकांचा अतिरेक होतो.

लोकशाहीमध्ये निवडणुकांद्वारे लोकांचे मतस्वातंत्रय जपलं हे खरं आहे. पण भारतासारख्या विकासनशील देशात निवडणुका या अत्यंत खर्चीक असल्यामुळे विकासाच्या आड येतात. निवडणुकांसाठी प्रचंड यंत्रणा कामाला लावावी लागत. सगळे शिक्षक आणि सरकारी कर्मचारी त्यासाठी, कामाला जुंपावे लागतात. त्यांना त्या कामाचं प्रशिक्षण द्यावं लागतं. देशाची निवडणूक म्हणजे वाहतूक खर्च, स्टेशनरी, हजारो कोटी रुपये खर्चाचा मामला असतो.

बरं त्या शांततेत आणि योग्य रीतीने पार पाडल्या तर ठीक! नाही तर फेरमतदान. निवडणुकीत निवडून येण्यासाठी अनेक वाईट मार्गाचा अवलंब केला जातो. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटी दिल्या जातात. वस्तू लुटल्या जातात. मोठमोठी आश्वासनं दिली जातात. यासाठ़ी लागणारा प्रचंड पैसा कारखानदार आणि उद्योगपती पुरवितात. त्यामुळे सत्तेवर येणारे यांच्या मदतीची परतफेड करण्यासाठी भाववाढ करण्यास परवानगी देतात.

एवढ्याने भागत नाही निवडणुकीच्या काळात प्रचंड हिंसाचार होतो. निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवाराचा खून करण्यापासून त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना दहशतीच्या वातावरणात राहण्याचा अनुभव, त्यांच्या नातेवाइकांचं अपहरण असे अनेक प्रकार घडतात. निवडणुकीच्या काळात खोर्ट मतदान करणं, मतदारांनी बाहेर येऊ नये म्हणून नीतीचं वातावरण निर्माण करणं आशा अनेक मार्गाचा अवलंब केला जातो. निवडणुक म्हणजे जणू शक्तीपरीक्षणच ठरतं, जो बलवान तो श्रेष्ठ ठरतो.

भारतामध्ये हे गैर प्रकार मोठ्या प्रमाणात विशेषत: उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांत चालत असत. परंतु निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी परिस्थितीत चांगलीच सुधारणा केली. प्रत्येक मतदाराला त्यांनी ओळखपत्र देऊन बोगस मतदान बंद केलं. निवडणुक आचारसंहिता घटनेत अस्तित्वात होती. तिचं कठोर पालन त्यांनी केलं. त्यामुळे प्रचारासाठी सरकारी यंत्रणेच्या वापराला पायबंद बसला. मुख्य म्हणजे निवडणूक काळात ध्वनिवर्धकांचा सतत कर्कश आवाज यामुळे सामान्य नागरी जीवन असहथ होत असे. त्या आवाजावर नियंत्रण आणल्यामुळे  जगणं सुसह्य झालं आहे. त्यांच्या आचारसंहितेमुळे बिहार, उत्तरप्रदेश काय पण जम्मू-काश्मीरमध्येही अतिरेक्यांच्या प्रभावक्षेत्रात लोकांनी निभर्यपणे मतदान केलं आहे.

निवडणुकांचं हे चित्र पाहता सामान्य माणसाला नेहमीच प्रश्न पडतो की, इतकी किंत देऊन निवडणुका घेणं योग्य आहे का? घेतल्या तरी त्यातून मूळ हेतू साध्य होतो का? आज निवडणुकांचं चांगलं बदललेल चित्र पाहून या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी घ्यावं लागतं. लोक जसजसे सुशिक्षित होऊ लागले आहेत, तसतसे परिस्थितीत बदल होऊ लागला आहे. टी.व्ही., चित्रपट, वृत्तपत्रं यांसारख्या प्रसारमाध्यमांनी मतदाराचं एक मत किती किंमती आहे, हे पटवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे.

बुद्धिवान लोक निवडणुकीपासून, राजकारणापासून लांब राहतात. पण राज्यकारभार योग्य व्यक्तींच्या हाती राहावा यासाठी बुद्धिवान, चरित्रसंपन्न माणसं राजकारणात आली पाहिजेत. नुसतं निवडणुकीला नाव ठेवून उपयोग नाही.

ही सगळी किंमत स्वातंत्र्यासाठी आहे आणि स्वातंत्र्य हा तर लोकशाहीचा प्राण आहे. म्हणून निवडणुक पद्धतीत कितीही दोष, उणिवा असल्या तरी लोकशाही प्रक्रियेतील ती एक आवश्यक गोष्ट आहे. भारतासारख्या विस्ताराने मोठ्या, लोकसंख्येने प्रचंड, हवामानाची भरपूर विविधता असलेल्या, दुर्गम आणि ग्रामीण असलेल्या या देशात निःपक्षपाती निवडणुका घेणं खूपच कठीण गोष्ट आहे. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेरा चौदा वेळा आपण ती साध्य केली आणि लोकशाही जिवंत ठेवली. याबद्दल जगातून आपलं खूपं कौतुक केलं गेलं. त्याला आपण पात्र आहोतच. आपल्याला निवडणुकांचं महत्व कळलेलं आहे. हेही त्यातून दिसून येतं पुढे येणाऱ्या निवडणुका अधिक निर्भय वातावरणात होतील आणि लोकशाही जिवंत राहील याची खात्री वाटते.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×