Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- ‘माशेल’ गाव सोडणारे - ______
- वयाच्या सहाव्या वर्षी वारणारे - ______
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं! पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत. (3)
‘शिक्षण घेण्यासाठी ‘गरिबी’ हा अडसर ठरत नाही’, या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
Solution
१. कोण ते लिहा. (2)
- ‘माशेल’ गाव सोडणारे - माशेलकर
- वयाच्या सहाव्या वर्षी वारणारे - माशेलकरांचे वडील
२. डॉ. माशेलकर यांच्या आईच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष:
- दारिद्र्याशी संघर्ष करणारी
- धैर्यशील, खंबीर
- मुलाच्या शिक्षणासाठी जिद्द ठेवणारी
- खूप कष्ट करणारी - कष्टाळू
३. कोणतीही गोष्ट करायची इच्छा असली की मार्ग आपोआप सुचत असतात. त्यासाठी मग कोणतेही व कितीही संकटांचे डोंगर पार करायला तयार असते. ती संकटे म्हणजे आपल्यासमोर आव्हानच आहे असे वाटू लागते. त्यासाठी मनापासून इच्छा मात्र हवी.
डॉ. आंबेडकर यांचे अतिशय चांगले उदाहरण आहे. त्यांची परिस्थिती बेताची होती. पण त्यांना शिक्षणाबद्दल प्रेम होते. स्वतः अर्धपोटी राहुन त्यांनी पुस्तके खरेदी केली आणि आपला दिवसातील बराचसा वेळ ते पुस्तकांच्या सान्निध्यात घालवत असत. त्यासाठी त्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. यावरून ‘शिक्षण’ घेण्यासाठी ‘गरिबी’ हा अडसर ठरत नाही याची आपणाला प्रचिती येते.