Advertisements
Advertisements
Question
‘कवितेची ओळख’ या पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.
Long Answer
Solution
आजोबा म्हणतात ‘तू बनव भाजी छान चवळी, आण रे इकडे दातांची कवळी’ यावर आजी म्हणते- ‘तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास’ हा काव्यसंवाद मला खूप आवडला. कारण या संवादातून आजी-आजोबा यांचे गोड स्नेहबंध दिसून येतो. आजोबांचा मिस्किलपणा ‘चवळी-कवळी या यमकांतून प्रकट होतो. आजीच्या अनुभवातली चवळीची भाजी’ व आजोबांची दातांची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो. म्हणून हा काव्यसंवाद खास व गमतीशीर आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?