Advertisements
Advertisements
Question
कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
Solution 1
आशयसौंदर्य : 'वस्तू' या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.
काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.
भाषिक सौंदर्य : मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.
Solution 2
“वस्तू” या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंच्या आपल्या आयुष्यातील महत्त्वावर प्रकाश टाकला आहे. या कवितेतून कवीने आपल्या आयुष्यात या वस्तूंशी असलेल्या भावनिक नात्याची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्याशी निगडित स्नेह जपण्याचा संदेश दिला आहे.
आपल्या रोजच्या वापरातील वस्तू या निर्जीव असल्या तरी, त्यांच्या सततच्या वापरामुळे त्यांच्याविषयी आपल्याला एक भावनिक जिव्हाळा वाटू लागतो. कवी म्हणतात की, जरी या वस्तूंना माणसांप्रमाणे मन नसले तरी त्यांच्याशी सजीवांसारखे वागलो, त्यांचा आदर केला तर त्या जणू सुखावतात. यातून वस्तूंकडून मिळणाऱ्या सेवेला आपण दिलेला मान व्यक्त होतो.
वस्तूंना 'सुखावतात' ही मानवी भावना दिल्यामुळे या ओळींमध्ये चेतनगुणोक्ती अलंकार दिसतो. कवितेत चिंतनशीलता, भावोत्कटता आणि प्रांजळपणा यांचा सुंदर संगम आहे. संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता येथे अचूकपणे व्यक्त करण्यात आलेली आहे. मुक्तछंदातील या निवेदनात्मक रचनेत साध्या, सोप्या भाषेत कवीने एक अनोखा विचार मांडला आहे
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे लिहा.
वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ______
कारणे लिहा.
वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ______
‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.
एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
i. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी-
- ____________
- ____________
२) मानव व वस्तू यांच्यातील समान भावना - (2)
मानव | |
वस्तू |
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. |
३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
४) काव्यसाैंदर्य लिहा. (२)
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा.
पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
- वस्तूंना या गोष्टी नकोत- ______
- वस्तूना याची हमी हवी- ______
२) उत्तरे लिहा. (२)
वस्तूंना असे ठेवावे.
- ____________
- ____________
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. |
३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
४) काव्यसाैंदर्य लिहा. (२)
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (1)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)
पुढील ओळींचे रसग्रहण करा.
वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
क्र. | मुद्दे | वस्तू |
1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
2. | कवितेचा विषय - | |
3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. स्नेह - ______ |
ii. निखालस - ______ |