Advertisements
Advertisements
Question
लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात? का?
Answer in Brief
Solution
- नवजात बालकांची रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमकुवत असते. त्यामुळे, रोगप्रतिबंधक लसी देऊन त्यांचे विविध प्रकारच्या संसर्गापासून रक्षण करणे आवश्यक असते.
- अगदी सुरुवातीला पहिल्याच आठवड्यात बी.सी.जी. म्हणजे क्षयरोग प्रतिबंधक लस दिली जाते.
- यानंतर, त्रिगुणी लस (डीपीटी - डिप्थीरिया, पेर्ट्युसिस, टिटॅनस) तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या महिन्यात दिली जाते. यात घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यांसारख्या रोगांसाठी प्रतिबंधात्मक लस आहेत.
- त्रिगुणी लसीकरणाच्या वेळी तोंडावाटे पोलिओचे डोस दिले जातात.
- यानंतर, नऊ महिन्यांच्या मुलाला MMR म्हणजेच गालगुंड, गोवर आणि रुबेला यांसारख्या रोगांवर प्रतिबंधात्मक लस एकत्रितपणे दिली जाते.
- शाळेत जाणाऱ्या मुलांना टायफॉइड, कॉलरा या लसी दिल्या जातात. काही वेळा हिपॅटायटीसची लस पण दिली जाते.
shaalaa.com
प्रतिजैविके
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?
व्याख्या लिहा.
‘प्रतिजैविक’
लस कशी तयार केली जाते?
प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते?
मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?
विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात?