Advertisements
Advertisements
Question
मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.
Solution
1. अनंत/संपूर्ण लवचीक मागणी: (Ed = ∞): किंमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो. तेव्हा त्याला अनंत/संपूर्ण लवचीक मागणी म्हणतात. उदा., सोन्याच्या किंमतीत बदल न होता मागणी सतत वाढते.
मागणीची किंमत लवचिकता = `"मागणीतील शेकडा बदल"/"किमतीतील शेकडा बदल" = ∞`
मागणीची किंमत लवचिकता = ∞ (अनंत बदल)
आकृतीत दर्शविल्याप्रमाणे क या किंमतीला मागणी अनंत लवचिक (∞) आहे, जी ‘मम’ या मागणी वक्राने दर्शविली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचीक असते. तेव्हा मागणी वक्र ‘क्ष’ अक्षाला समांतर असतो.
2. संपूर्ण अलवचीक मागणी: (Ed = 0): किंमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचीक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदा., किमतीत २०% ने घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही.
मागणीची किंमत लवचिकता = `"मागणीतील शेकडा बदल"/"किंमतीतील शेकडा बदल"`
मागणीची किंमत लवचिकता = `(% Delta "म")/(% Delta "क")`
मागणीची किंमत लवचिकता = `०/(२०) = ०`
मागणीची किंमत लवचिकता = ०
व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते. उदा., मीठाला, दुधाला असलेली मागणी.
आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे ‘मम’ हा मागणीवक्र य अक्षास समांतर असतो. ‘अक’ या किंमतीस ‘अम’ ही मागणी आहे. किंमतीमध्ये ‘अक१’ , ‘अक२’ असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही.
3. एकक लवचीक मागणी: (Ed = 1): किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचीक मागणी म्हणतात. उदा., किमतीत ५०% ने घट झाल्यास मागणीत ५०% नेवाढ होते.
मागणीची किंमत लवचिकता = `"मागणीतील शेकडा बदल"/"किमतीतील शेकडा बदल"`
मागणीची किंमत लवचिकता = `(५०)/(५०) = १`
आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे ‘कक१’ हा किमतीतील बदल आहे. तर ‘बब१’ हा मागणीतील बदल आहे. हे दोन्हीही बदल एकसारखे असल्याने ‘मम’ हा मागणी वक्र एकक लवचीक मागणी दर्शवितो व तो आयताकृती परिवलयाचा असतो.
4. जास्त लवचीक मागणी: (Ed > 1): किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्याला जास्त लवचीक मागणी म्हणतात. उदा., किमतीत ५०% ने घट झाल्यास मागणीत १००% नेवाढ होते.
मागणीची किंमत लवचिकता = `"मागणीतील शेकडा बदल"/"किमतीतील शेकडा बदल"`
मागणीची किंमत लवचिकता = `(१००)/(५०) = २.०`
(Ed > 1)
आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे ‘बब१’ हा मागणीतील बदल ‘कक१’ या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मम हा मागणीवक्र लवचीक मागणी दर्शवितो. या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो.
5. कमी लवचीक मागणी: ( Ed < १): जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचीक मागणी म्हणतात. उदा., किमतीत ५०% ने घट झाल्यास मागणीत २५% ने वाढ होते.
मागणीची किंमत लवचिकता = `"मागणीतील शेकडा बदल"/"किमतीतील शेकडा बदल"`
मागणीची किंमत लवचिकता = `(२५)/(५०) = ०.५`
आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे ‘बब१’ हा मागणीतील बदल ‘कक१’ या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे. म्हणून मम हा मागणी वक्र कमी लवचीक मागणी दर्शवितो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
संपूर्ण अलवचीक मागणीशी संबंधित चुकीची विधाने
(अ) किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही.
(ब) Ed=1
(क) मागणी वक्र 'क्ष' अक्षाशी समांतर
(ड) किंमत लवचीकतेचा एक प्रकार
जास्त लवचीक मागणी : Ed> १ :: कमी लवचीक मागणी : ______
तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचीक मागणी : पसरट मागणी वक्र : ______
किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल.
मागणी वक्र जेव्हा 'य' अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला______.
Ed=0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू ______.
विधान (अ): एकक लवचीक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो.
तर्क विधान (ब): किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचीक मागणी असे म्हणतात.
फरक स्पष्ट करा.
संपूर्ण लवचीक मागणी व संपूर्ण अलवचीक मागणी
सहसंबंध पूर्ण करा:
संपूर्ण लवचीक मागणी : ED = ∞ : : ______ : ED = 0