Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कारणे लिहा. (2)
- दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ______
- लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यांकडून धम्म कलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण ______
माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्याएवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो! माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो! तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत. (3)
तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.
Solution
१.
- दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण लेखकाचे वडील पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत असल्यामुळे मुलांसाठी खेळणी घेणे त्यांना शक्य नव्हते.
- लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यांकडून धम्म कलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण दिवसभर खेळून संध्याकाळी घरी येईपर्यंत त्यांच्या बद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानावर आलेल्या असायच्या.
२.
३. लहानपणी लेखक घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडांपासून स्टंप व बॅट बनवून खेळत असे. यावरून त्यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्याचे दिसून येते. नंतर लेखक त्यांच्या चुलत्याकडे वाय. एम. सी. ए. च्या कंपाउंडमध्ये राहायला गेले. तेथे ग्राऊंडजवळ असल्याने शाळा सुटल्यावर ते धावतच ग्राऊंडकडे जात असत आणि तेथे चालू असणाऱ्या खेळात बॉल टाकण्याचे काम करत असत. यातून त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली. वडिलांनी आणून दिलेल्या जुन्या बॅटमुळे लेखक अतिशय आनंदी झाले. पुण्याच्या ग्राऊंडवर झालेल्या क्रिकेटचा सामना लेखकांनी झाडावर चढून पाहिला, त्या सामन्यानंतर तेथील खेळाडूंची स्वाक्षरी घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून लेखकाच्या मनात विचार आले. आपण मोठे झाल्यावर खेळाडू झालो तर स्वाक्षरीसाठी आपल्याभोवतीही अशीच गर्दी होईल. यातून लेखक क्रिकेटची स्वप्ने पाहू लागले. अशाप्रकारे लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज रुजले आणि उगवले.