Advertisements
Advertisements
Question
‘माणसं पेरायला लागू’ या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा.
Short Note
Solution
कवी वीरा राठोड यांनी 'मनक्या पेरेन लागा' या कवितेत "बीज" व 'माती' यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे.
त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकांतून एक सुंदर विचार मांडला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते. बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे. त्याप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल, हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो. म्हणून 'माणसं पेरायला लागू' हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते.
shaalaa.com
मनक्या पेरेन लागा
Is there an error in this question or solution?