Advertisements
Advertisements
Question
मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.
Explain
Solution
- रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे, जे रक्तवाहिन्यांमध्ये वाहते. हे रक्तद्रव आणि रक्तकणिका/रक्तपेशी या दोन घटकांनी बनलेले आहे.
- प्लाझ्मा हा पिवळसर रंगाचा नितळ द्रव आहे, जो पाणी (90%) आणि काही विरघळलेले पोषक, प्रथिने, असेंद्रिय क्षार आणि टाकाऊ पदार्थांनी बनलेला असतो.
- रक्तामध्ये तीन प्रकारच्या रक्तपेशी असतात:
- लोहित रक्तपेशी: त्यात हिमोग्लोबिन नावाचे लाल रंगद्रव्य असते, जे शरीराच्या सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवते.
- श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी): शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराचे संरक्षण करतात.
- रक्तपट्टीका: जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा काही काळानंतर रक्तस्त्राव थांबतो. रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या रक्तपट्टीकाच्या क्रियेमुळे हे घडते.
- रक्ताची कार्ये:
-
हे शरीराच्या विविध भागांमध्ये पोषकतत्व आणि ऑक्सिजन पोहोचवते.
-
शरीरातील विविध भागांमधून टाकाऊ पदार्थ उत्सर्जन अवयवांकडे नेतो, जेणेकरून ते शरीराबाहेर टाकता येतील.
-
संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्तादवारे वाहून नेली जातात.
-
रोग वाहक जंतूंपासून शरीराचे रक्षण करते.
- शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत होते.
-
shaalaa.com
Is there an error in this question or solution?