Advertisements
Advertisements
Question
मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?
Answer in Brief
Solution
- मानवी वस्तीकरता जमिनीचा उतार व सुपीकता, अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता खनिजसाठा, वाहतुकीच्या सोई इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण असतात. अशा प्रकारची स्थिती जेथे उपलब्ध होते तेथे मानवी वस्त्यांची वाढ होते.
- उदा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार आणि भारतातील शेतीखालील इतर भाग या ठिकाणी मानवी वस्ती केंद्रित स्वरूपाची आहे.
- तर, ब्राझीलमध्येही किनारपट्टीजवळील सावो पावलो हा कॉफीच्या उत्पादनासाठी सुयोग्य प्रदेश आहे. शिवाय, सागर सान्निध्य, मुबलक खनिजसाठा, वाहतुकीच्या सोई यांमुळे येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आहे.
- याउलट, जेथे मानवी वस्तीस फारशी अनुकूल स्थिती नाही, त्या ठिकाणी विखुरलेली मानवी वस्ती आढळते.
- उदा. भारतात हिमालयाच्या उतारावरील प्रदेश, विखंडित व उंचसखल प्रदेश, मध्य भारताचा वनाच्छादित प्रदेश, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग इत्यादी ठिकाणी मानवी वस्ती विखुरलेली आहे.
- तसेच, ब्राझीलमध्ये ईशान्य भागातील अवर्षणग्रस्त उच्चभूमीच्या प्रदेशात मर्यादित शेती आणि ॲमेझॉन खोऱ्यात घनदाट विषुववृत्तीय वने, रोगट हवामान व वाहतुकीच्या मर्यादित सोई यांमुळे याठिकाणी विखुरित वस्त्या आढळतात. याला अपवाद निग्रो व ॲमेझॉन नद्यांच्या संगमावरील मॅनॉस बंदर.
अशारीतीने, एकूण देशांचा विचार करता हवामान जमिनीचा उतार व सुपीकता, पाण्याची उपलब्धता, वाहतुकीच्या सोई यांमध्ये भिन्नता असल्याने मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानी झालेली आढळते.
shaalaa.com
मानवी वस्ती
Is there an error in this question or solution?