Advertisements
Advertisements
Question
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
'मराठी असे आमुची मायबोली.' माझी मातृभाषा 'मराठी' मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडीच आहे! मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, कवी केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींनी तिला शब्दलेण्यांनी साकारलेली आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण, भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत, पंत आणि तंत परंपरेने तिला नटवलेली आहे. इतर कलांनी तिला सजवलेली आहे. मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे. मराठी बोलीभाषेचे ठिकठिकाणच्या प्रदेशांतील झरे प्रमाण मराठीच्या नदीत मिसळून मराठी गंगा अविरत वाहते आहे व काठांवरील लोकसंस्कृतीला जगवते आहे. मराठी भाषेतील लोकगीते व बोधकथा ही मराठी संस्कृतीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.
'माझा मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे
निळ्या अमृताची ओल'
प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा सार्थ अभिमान अधोरेखित होतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.