English

मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती -

Advertisements
Advertisements

Question

मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती

Answer in Brief

Solution

मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतीची पूर्वतयारी काही प्रमाणात करावी लागते कारण या पूर्वतयारीवर मुलाखतीचे यश अवलंबून असते म्हणून काही मुद्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी करावी लागते.

  1. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती - मुलाखत मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांच्यात संवाद होत असतो. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखत त्याला बोलते करण्याचे कार्य मुलाखतकार करीत असतो. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. मुलाखत त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, आवडीनिवडी, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, हुद्दा, लेखनकार्य, पुरस्कार, वैचारिक पार्श्वभूमी, वैचारिक भूमिका इत्यादींची सविस्तर माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक असते. या माहितीमुळे मुलाखतीतील संवाद सहज होऊ शकतो.
  2. मुलाखत दात्याचे कार्य - ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात अमूल्य ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते ज्यांच्याजवळ काहीतरी 'सांगण्यासारखे' आहे आणि ज्यांच्याकडून 'ऐकण्यासारखे' काहीतरी आहे अशा व्यक्तींची मुलाखत ऐकणे लोकांनाही आवडते. मुलाखत त्यांचे कार्य हे मुलाखतीत केंद्रस्थानी असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीत मुलाखतकाराला मुलाखत दात्याचे कार्यकर्तृत्व पूर्णपणे जाणून घ्यावे लागते. मुलाखत त्यांचे कार्यक्षेत्र, स्वरूप, संघर्ष, कार्यसिद्धीसाठी जिद्द अशा कितीतरी गोष्टी ची सखोल माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. संदर्भ लक्षात घेऊन, चिंतन करणे गरजेचे असते. रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांना किंवा वाचकांना मुलाखत त्यांचे कार्य प्रवास उलगडून दाखवणे हे मुलाखतीचे प्रमुख कार्य असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीत ही महत्त्वाची बाब मानली जाते.
  3. प्रश्नांची निर्मिती - मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मुलाखतकर्त्याने मुलाखतीसाठी जो विषय घेतला आहे त्याविषयानुसार मुलाखत देणाऱ्या व्यक्तीस कशाप्रकारे प्रश्न विचारता येतील याविषयी विचार करून प्रश्नांची निर्मिती करता येते. प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जास्तीत जास्त प्रभावी कसे करता येईल याचा विचार करून प्रश्ननिर्मिती करावी लागते. प्रश्नांची निर्मिती करताना मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वातील सर्व पैलूंना स्पर्श होईल हे पाहावे लागते मात्र होकारार्थी, नकारार्थी उत्तरे येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. विचारलेल्या प्रश्नांतून जास्तीत जास्त प्रभावी उत्तरे कशी मिळतील तसेच मुलाखतीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रश्नांची निर्मिती करावी.
shaalaa.com
मुलाखत
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×