Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- स्टेशनमास्तरांकडे धाव घेणारा - ______
- गाडी दीर्घकाळ थांबविण्याचा आदेश देणारे - ______
निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत (3)
निरंजनने त्याक्षणी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत लिहा.
Solution
१.
- स्टेशनमास्तरांकडे धाव घेणारा - निरंजन
- गाडी दीर्घकाळ थांबविण्याचा आदेश देणारे - स्टेशन मास्तर
२.
३. निरंजनची पुलावरच्या खराब रुळावर नजर गेल्यावर तो याची कल्पना देण्यासाठी स्टेशनमास्तराकडे गेला. पण स्टेशनमास्तराला ते खरे वाटेना. तेव्हा तो म्हणाला की, “हे खरे नसेल तर मल पोलिसांच्या ताब्यात द्या.” यावरून स्टेशनमास्तरांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी रूळ पाहिला. पंचनामा केला, गाडी थांबविण्याचे आदेश दिले. पंचनामा वगैरे गोष्टी होईपर्यंत निरंजनच्या पेपरची वेळ निघून गेली.
यावरून निरंजनने आपल्या पेपरला महत्त्व न देता रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार केला. या रुळाबाबत स्टेशनमास्तरांना सांगितले नसते तर भयंकर अपघात होऊन प्राणहानी झाली असती. त्यामुळे त्याक्षणी निरंजनने घेतलेला एका क्षणातील निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकला. किती भयानक गोष्ट ही त्याच्या निर्णयावर होती. पेपर आज नाही, नंतर देता येतो पण लोकांच्या प्राणाचे काय? म्हणून त्याचा निर्णय योग्य होता.