Advertisements
Advertisements
Question
‘निसर्ग हा मोठा जादूगर आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
Solution
जीवसृष्टी फुलण्यासाठी, बहरण्यासाठी पुरेसे पाणी, ओलावा, सुपीक माती असणे गरजेचे असते; पण वाळवंटी प्रदेशात अशी स्थिती नसते. ठणठणीत कोरडेपणा, पाण्याची प्रचंड कमतरता आणि जराही ओलावा नसलेली रेताड जमीन ही वाळवंटी प्रदेशाची प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत; मात्र अशा कठीण नैसर्गिक स्थितीतही निसर्गाने या ठिकाणी टिकून राहतील अशा वनस्पती आणि प्राणी निर्माण केले आहेत. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो.
कधी कधी तर दोन-तीन वर्षांच्या अंतराने पाऊस पडतो, खूप काळ चालणाऱ्या दुष्काळाच्या या काळात येथील झाडे-झुडपे निष्पर्ण होतात. या कठीण, प्रतिकूल काळानंतर जेव्हा एक दिवस पाऊस पडतो तेव्हा एखादी जादू व्हावी तशी जमिनीत दडून राहिलेल्या बियांमधून रोपे उगवतात, निष्पर्ण झाडाझुडपांना चैतन्यमयी पालवी फुटते. रोपांवर भरगच्च फुले फुलतात. बराच काळ वैराण, ओसाड असलेला हा प्रदेश विविधरंगी पानाफुलांनी बहरून जातो, चित्रमय दिसू लागतो. अशाप्रकारे, ‘निसर्ग हा फार मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात लागू पडते, हे ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे स्पष्ट होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
टिपा लिहा.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
टिपा लिहा:
सग्वारो कॅक्टस
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.