English

पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

(१) स्थायू पदार्थास उष्णता दिल्यास सुरुवातीस त्याचे तापमान वाढते. या वेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची (अणू, रेणू इत्यादी) गतिज ऊर्जा वाढवण्यात, तसेच त्या कणांमधील आकर्षण बल विरुद्ध कार्य करण्यात, म्हणजेच अणू/रेणूंमधील बंध कमकुवत करण्यासाठी वापरली जाते. उष्णता देणे सुरू ठेवल्यास ठरावीक तापमानाला (द्रवणांक) स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते. या वेळी तापमान स्थिर राहते व पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणांमधील बंध तोडण्यासाठी व अवस्थांतरासाठी वापरली जाते. या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.
(२) द्रवाचे द्रवाच्या उत्कलनांकावर वायूमध्ये रूपांतर होतानाही उष्णता शोषली जाते, पण तापमान बदलत नाही. या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. या वेळी शोषलेल्या उष्णतेचा वापर द्रवाच्या कणांमधील बंध कमकुवत करण्यासाठी व अवस्थांतरासाठी होतो.
(३) काही पदार्थांच्या बाबतीत ठरावीक भौतिक स्थिती असताना स्थायूचे बाष्पात रूपांतर होऊ शकते. या वेळीही उष्णता शोषली जाते, पण तापमान स्थिर राहते. या उष्णतेस संप्लवनाचा अप्रकट उष्मा म्हणतात.
(४) अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाचे स्थिर तापमानास अवस्थांतर होत असताना पदार्थाने शोषून घेतलेली अथवा बाहेर टाकलेली उष्णता होय. द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना, बाष्पाचे द्रवात रूपांतर होताना, तसेच बाष्पाचे स्थायूत रूपांतर होताना हा अप्रकट उष्मा पदार्थाकडून बाहेर टाकला जातो.

shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: उष्णता - स्वाध्याय [Page 72]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 उष्णता
स्वाध्याय | Q ७. इ. | Page 72

RELATED QUESTIONS

बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g) 


जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.


बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा अ) हवा बाष्पाने संपृक्त होणे
2) बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा ब) स्थायूचे द्रवात रूपांतर होणे
3) दवबिंदू तापमान क) द्रवाचे वायूत रूपांतर होणे

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) कोरडी हवा अ) 4°C
2) दमट हवा ब) सापेक्ष आर्द्रता 100%
3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी
4) पाण्याची महत्तम घनता ड) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त
    इ) - 4°C

नावे लिहा.

पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.


बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.


खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. दिलेला आलेख काय दर्शवतो?
  2. रेषा AB काय दर्शवते?
  3. रेषा BC काय दर्शवते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×