Advertisements
Advertisements
Question
पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.
Short Answer
Solution
पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण झाडे लावायला हवीत. लावलेल्या झाडांची घरातील सदस्यांसारखी काळजी घ्यायला हवी. घराबाहेर, गॅलरीत तसेच खिडकीजवळ पक्ष्यांसाठी चारा व दाणापाणी यांची सोय करता येईल. घराच्या किंवा इमारतीच्या आवारात फुलझाडे लावली अथवा बाग फुलवली तरी परिसरातील पक्ष्यांची संख्या वाढू शकेल, असे मला वाटते. पक्ष्यांविषयीची माहितीपर व्याख्याने किंवा दूरदर्शन, वर्तमानपत्रातील पक्षीसंगोपनाविषयी माहिती वाचून नवनवीन कल्पना राबवता येतील.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?