Advertisements
Advertisements
Question
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
लॅमार्कवाद
Answer in Brief
Solution
-
लॅमार्कवादमध्ये जीन बाप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाने दिलेल्या उत्क्रांतीवरील पुढील दोन सिद्धांतांचा समावेश होतो:
अ) इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत.
ब) मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. - लॅमार्क यांच्या मते, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत होणारे बदल हे त्या जिवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसामुळे होतात.
- सजीव जो अवयव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व विकास होतो. याला त्यांनी 'इंद्रियांचा वापर व न वापर' असे म्हटले.
- याची उदाहरणे देण्यासाठी त्यांनी जिराफाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हटले. तसेच लोहाराचे खांदे बळकट होण्याचे कारण म्हणजे तो सतत घणाचे घाव घालतो. न उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कमकुवत झाले. उदा., शहामृग, इमू. पाणपक्ष्यांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले, उदा., हंस, बदक. सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले.
- ही सर्व उदाहरणे म्हणजे 'मिळवलेली वैशिष्ट्ये' अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच लॅमार्कवाद म्हटले आहे.
- लॅमार्कवाद हा उत्क्रांतीचा सिद्धांत ग्राह्य धरला जात नाही; कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे शोधांद्वारे लक्षात आले आहे. त्यामुळे लॅमार्कचे म्हणणे चुकीचे ठरते.
shaalaa.com
लॅमार्कवाद (Lamarckism)
Is there an error in this question or solution?