Advertisements
Advertisements
Question
प्राथमिक आर्थिक व्यवसायाची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा.
Solution
आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी मानव विविध क्रिया करतो, त्यांना मानवी व्यवसाय म्हणतात. मानव विविध प्रकारचे व्यवसाय करतो, मानवी व्यवसायांची प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय अशी वर्गवारी करण्यात येते. या सर्व व्यवसायात प्राथमिक व्यवसायांचे स्वतःचे असे स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान आहे.
प्राथमिक आर्थिक व्यवसाय नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले आहेत. या व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
(१) मानवाची अन्नाची मूळ गरज भागवण्याचे काम प्राथमिक व्यवसाय करतात. मात्र आता अन्नाच्या गरजेबरोबरच इतर अनेक व्यवसायांना लागणारा कच्चामालही प्राथमिक व्यवसाय पुरवतात.
(२) प्राथमिक व्यवसाय हा जगातील सर्व खंडात आणि देशात केला जातो.
(३) प्राथमिक व्यवसाय हे सर्वस्वी भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात.
(४) या व्यवसायात निसर्गातील उपलब्ध पदार्थांचा आहे त्या स्थितीत उपयोग केला जातो. उदा., जंगलांचा किंवा वाहनांचा उपयोग फळे व कंदमुळे गोळा करण्यासाठी आणि लाकूडतोड्याच्या व्यवसायासाठी केला जातो. मृदेचा उपयोग शेतीसाठी केला जातो. खनिजांचा उपयोग खाणकामासाठी केला जातो आणि जनावरांचा उपयोग पशुपालनासाठी केला जातो.
(५) या व्यवसायात पारंपरिक साधनांच्या साहाय्याने उत्पादने घेतली जातात. उदा., शिकारीसाठी धनुष्यबाण आणि भाले, तर शेतीसाठी नांगर आणि पशू अशा परंपरागत साधनांचा वापर केला जातो.
(६) मात्र आता जागतिक लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाढत्या गरजा भागवण्यासाठी प्राथमिक व्यवसायात आता आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. त्यामुळेच प्राथमिक व्यवसाय यांचे स्वरूप बदलत आहे.
(७) प्राथमिक व्यवसायाचे स्वरूप बदलत असले, तरी त्यांचा मूळ उद्देश अजूनही तसाच आहे.
(८) सर्व प्राथमिक व्यवसाय हे कोणत्या ना कोणत्यातरी स्वरूपात अन्नाची गरज भागवतात आणि कच्च्या माल पुरवतात.
(९) जगातील सर्वाधिक लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे. उदा., भारत, चीन यांसारख्या देशात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आढळतो.