English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

प्रेक्षणीय स्थळाच्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

प्रेक्षणीय स्थळाच्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा. 

Very Long Answer

Solution

  1. स्थळ: सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेले महाबळेश्वर हे थंडहवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. त्या ठिकाणी आम्ही भेट दिली.
  2. वैशिष्ट्ये: घाट चढल्यावर लगेच प्रतापगड आहे.. प्रतापगडाच्या पायथ्याशीच अफजल खानाची व शिवाजी महाराजांची भेट झाली होती. विशाळगड याच परिसरात आहे. पाच नद्यांचा संगम असलेल्या जुन्या महाबळेश्वर मध्ये देऊळ बांधलेले आहे. सह्याद्री पर्वतरांगा असल्याने येथे भरपूर पाऊस पडतो. थंडी खूप असते.
  3. परिसर: येथील प्रेक्षणीय स्थळांना पॉईंट म्हणतात. महाबळेश्वरचे वेगवेगळे पॉईंट पाहत आम्ही हिंडत होतो. इकोपॉइंटवर मी वेगवेगळे आवाज काढण्याचा आनंद लुटला.
  4. निसर्गसौंदर्य: समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उद्याने, वैभवसंपन्न मनमोहक वाडे, इमारती यामुळे येथे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. त्या ठिकाणी मावळणारे सूर्यबिंब खूप सुंदर दिसत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे आम्ही सनराइज्‌ पॉईंट पाहिला. नंतर तलावात बोटिंगचा आनंद घेतला.
  5. आख्यायिका, कथा: एका आख्यायीकेच्या अनुसार सृष्टीचे आणि मनुष्यप्राणी निर्माण केल्यानंतर भगवान ब्रह्मांना पश्चात्ताप होऊ लागला. आपल्या कृत्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी महाबळेश्वरच्या अरण्यांमध्ये ब्रह्मांनी कठोर तप सुरु केले. जेव्हा ब्रह्मा ध्यानस्थ बसले होते, तेव्हा महाबली आणि अतिबली या दोन असुरांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा चंग बांधला. हे पाहून भगवान विष्णू ब्रह्माच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अतिबलीचा वध केला. महाबलीला मात्र इच्छामृत्यूचे वरदान असल्याने त्याचा वध करणे अशक्य होते. म्हणूनच देवी महामायेची मदत विष्णूंनी मागितली. देवी महामाया सौंदर्यवती असल्याने तिच्या रूपाने महाबलीला भुरळ पडली. तिला मिळविण्यासाठी ती जे काही मागेल ते देण्यास महाबली तयार झाला. महामायेने ही संधी घेऊन महाबलीकडे, त्याचा मृत्यू मागितला. महामाया जे काही मागेल ते तिला देण्यासाठी महाबली वचनबद्ध असल्याने आपल्या मृत्यूचा स्वीकार त्याला करावाच लागला, पण तत्पूर्वी आपले नाव श्री शंकराशी जोडले जावे असा वर महाबलीने महामायेकडे मागितला. म्हणूनच या ठिकाणाचे नाव महाबळेश्वर पडले असल्याची आख्यायिका आहे. 
  6. लोकपरंपरा: पाच नद्यांचा संगम असलेल्या जुन्या महाबळेश्वर मध्ये देऊळ बांधलेले आहे. आजूबाजूला आणखी इतर देव-देवतांची मंदिरे आहेत. ज्या त्या मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे होतात. पाचगणीत अनेक सांस्कृतीक कार्यक्रम साजरे होतात. 
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: बाली बेट - शोध घेऊया. [Page 4]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.1 बाली बेट
शोध घेऊया. | Q (इ) | Page 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×