Advertisements
Advertisements
Question
परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
मी पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो. |
अ. माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे?
आ. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो?
इ. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का?
ई. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का?
Solution
अ. पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो. तेथे सतत हिमाचे आवरण असते. काळ्या आणि पांढऱ्या त्वचेचा रंग हा एक प्रकारचा अनुकूलन आहे, जो छलावरण (camouflaging) म्हणून ओळखला जातो. याला विपरीत-छायांकन (counter-shading) म्हणतात. शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते. पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही. त्यामुळे भक्षकापासून त्याचे रक्षण होते.
आ. नेहमी एकत्र राहिल्यामुळे संरक्षण मिळते. पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते. एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी-वाऱ्यापासून ऊब मिळते. म्हणून आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून राहतो.
इ. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तेथील तापमानाशी जुळवून घेता आले पाहिजे. त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे.
ई. मी ध्रुवीय प्रदेशात विशेषकरून अंटार्क्टिका खंडात राहतो. कारण इथे मला माझे खाद्य भरपूर प्रमाणात मिळते.