English

पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?

Answer in Brief

Solution

  1. जेव्हा ढगांपासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी घन किंवा द्रव म्हणून पडते तेव्हा पर्जन्यवृष्टी होते. पर्जन्यवृष्टीचे सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हिमवृष्टी, गारपीट आणि पर्जन्य किंवा पाऊस पडणे.
  2. हिमवृष्टी: वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूखाली जाते, तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन म्हणतात. या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात.
  3. गारा: भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जाेरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते.
  4. पर्जन्य किंवा पाऊस: आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते, त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धूलिकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते.
shaalaa.com
वृष्टी
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: वृष्टी - स्वाध्याय [Page 49]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5 वृष्टी
स्वाध्याय | Q 5. (अ) | Page 49

RELATED QUESTIONS

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.


पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.


पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही.


वेगळा घटक ओळखा.


फरक स्पष्ट करा.

हिम आणि गारा


तुमच्या शाळेतील पर्जन्यमापक वापरून पावसाळ्यातील एका आठवड्यात तुमच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची सलग नोंद घ्या. मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे पावसाचे प्रमाण दाखवणारा स्तंभालेख संगणकाच्या आधारे तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×