Advertisements
Advertisements
Question
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोणत्या सुविधा सुरु केल्या आहेत?
Answer in Brief
Solution
- पर्यटन हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक प्रगत, विकसित होत जाणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातून आपल्या देशास परकीय चलन मोठया प्रमाणात मिळते.
- विदेशी पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून गृह, पर्यटन आणि विदेश मंत्रालय यांनी एकत्र येऊन ई-व्हिसा सुविधा सुरु केली. यात ई-व्यावसायिक व्हिसा, ई-मेडिकल व्हिसा, ई-व्हिसा सुविधा देण्यात आल्या.
- २०१६ पासून या पर्यटकांना हिंदी, इंग्रजी शिवाय १० परकीय भाषांमध्ये आठवड्याचे सर्व दिवस आणि २४ तास माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- अरबी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, चिनी पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश भाषेत पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवर माहीती दिली जाते.
- पर्यटनास उभारी देण्यासाठी तसेच अधिकाधिक पर्यटक आकर्षित करण्यासाठी 'अतुल्य भारत' ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली.
- पर्यटकांना राहण्याची उत्कृष्ट सोय करण्यासाठी हॉटेल्स निर्माण करण्यात आली आहेत. आतिथ्य आणि हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या उत्तम संस्था अनेक शहरात आहेत.
shaalaa.com
सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र
Is there an error in this question or solution?