Advertisements
Advertisements
Question
पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा.
Solution
(१) भारतात सुमारे ४८.८ टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, २४.३ टक्के लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात आणि २६.९ टक्के लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात गुंतलेली आढळते.
(२) ब्राझीलमध्ये सुमारे १० टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, १९ टक्के लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात आणि ७१ टक्के लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात गुंतलेली आढळते.
(३) भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा १७ टक्के, द्वितीयक क्षेत्राचा वाटा २६ टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा वाटा ५७ टक्के आढळतो.
(४) ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा ५.५ टक्के, द्वितीयक क्षेत्राचा वाटा २७.५ टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा वाटा ६७ टक्के आढळतो. यावरून असे दिसून येते की, भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे. याउलट, ब्राझीलची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ________
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था __________ प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा (%)
(भारत व ब्राझील)
वर्षे | भारत | ब्राझील |
१९७० | ०८ | १७ |
१९८० | १५ | २० |
१९९० | १८ | १५ |
२००० | २८ | २४ |
२०१० | ५० | २५ |
२०१६ | ४० | २६ |
प्रश्न-
- कोणत्या देशाचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे?
- २०१६ मध्ये भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा किती हिस्सा होता?
- १९८० मध्ये ब्रझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती आहे?
खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारताची ब्रझील सोबत झालेली निर्यात
(दशलक्ष यु. एस. डॉलरमध्ये)
वर्षे | निर्यात |
२००८ | ३७०० |
२००९ | २२०० |
२०१० | ४२०० |
२०११ | ६१०० |
२०१२ | ५००० |
प्रश्न-
- २००८ ला भारताची निर्यात किती होती?
- भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या वर्षी होती?
- २००९ ते २०११ या कालावधीत भारताच्या निर्यातीत किती दशलक्षाने वाढ झाली?
खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- वरील आलेखाचा प्रकार कोणता?
- या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत?
- कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे?
- 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे?
- 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे?
- 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे?