Advertisements
Advertisements
Question
पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.
घटना | घटना केव्हा घडली |
(अ) सोनाली अण्णांवर रागावली. | ______ |
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. | ______ |
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. | ______ |
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. | ______ |
Solution
घटना |
केव्हा घडली? |
(अ) सोनाली अण्णांवर रागावली. |
(१) जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा. |
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. |
(२) सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले, तेव्हा. |
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. |
(३) त्या गृहस्थांनी दीपालीला उचलून घेतले, तेव्हा. |
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. |
(४) ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली, तेव्हा. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुलना करा.
सोनाली | रूपाली |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.
सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत - ______
खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.
रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी - ______
खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.
सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली - ______
खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.
सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली - ______
सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा.
____________
____________
सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. कृती पूर्ण करा: (2)
झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन् रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. |
2. कोण ते लिहा: (2)
- सोनालीवर ताईगिरी करणारी - ______
- झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी - ______
3. स्वमतः (3)
सोनाली व रूपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.