Advertisements
Advertisements
Question
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोण ते लिहा. (२)
- भातुकलीचा खेळ खेळणारी- ______
- चेंडूचा खेळ खेळणारा- ______
२) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
- मुलगी मुलाचा हा खेळ खेळून दाखवते.- ______
- मुलगा गॅससमोर बसून ही कृती करतो.- ______
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
तेव्हा तो हसून म्हणतो,
'तू भाजी बनवू छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
Solution
१)
- भातुकलीचा खेळ खेळणारी- मुलगी
- चेंडूचा खेळ खेळणारा- मुलगा
२)
- मुलगी मुलाचा हा खेळ खेळून दाखवते.- चेंडू उडवून पकडण्याचा
- मुलगा गॅससमोर बसून ही कृती करतो.- बाहुलीला थोपटून झोपवतो व भाजीसाठी पातेलं शोधतो.
३) मुलगी मुलाकडे चेंडू मागते तेव्हा तो हसून तिची चेष्टा करत म्हणतो – 'तू छानपैकी पाल्याची भाजी बनव.' त्याला वाटत असते, की आपल्याप्रमाणे हिला चेंडूचा खेळ जमणार नाही. (भाजी करणे हे तुझे काम! तुला पुरुषी कामे काय जमणार?) तेव्हा मुलगी त्याला 'मी दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते. तू करू शकशील का?' असा उलट प्रश्न विचारते. मुलगा स्वतःचा चेंडू तिच्या हाती देतो.
४) 'आश्वासक चित्र' या कवयित्री नीरजा यांच्या कवितेत स्त्री-पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले आहे. ते भविष्यात प्रत्यक्ष साकार होईल असा विचार येथे मांडला आहे. भातुकली व चेंडू हे खेळ स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक कामांचे प्रतिनिधित्व करतात. भविष्यात त्यांनी एकमेकांच्या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडावे असे कवयित्रीला वाटते. स्त्री-पुरुषांनी समानतेचे जीवन स्वीकारावे, परस्पर सामंजस्य व सहकार्याने जीवन जगावे, असा सकारात्मक संदेश कवयित्री या कवितेतून देऊ पाहते.
प्रस्तुत कवितेतील मुलगी भातुकली बाजूला सारून 'चेंडू' हा तथाकथित पुरुषी खेळ खेळते आणि मुलगा चेंडू मुलीकडे देऊन स्त्रियांचा समजला जाणारा 'भातुकली' खेळ खेळू लागतो. ह्या बदलत्या चित्रातून कवयित्रीला अशी आशा वाटत आहे, की ही मुले भविष्यात मोठी होऊन पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडतील. परस्पर सामंजस्य व सहकार्याने जीवन जगतील; ज्यामुळे आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्री-पुरुषांतील भेदाभेद नष्ट होतील. ज्या सहजतेने ही मुले एकमेकांचे खेळ खेळतात, त्याच सहजतेने ही मुले उद्या मोठी झाल्यावर प्रत्यक्ष जीवनात एकमेकांची कामे करतील. दोघे मिळून सर्व जबाबदाऱ्या उचलतील, याची कवयित्रीला खात्री वाटते. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारा सार्वकालिक विचार येथे मांडला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) ______
(आ) ______
चौकट पूर्ण करा.
कवयित्रीच्या मनातील आशावाद - ______
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी
खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही’
‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
२) उत्तरे लिहा. (२)
- मुलगी खेळत असलेले ठिकाण - ______
- कवयित्री जेथून पाहते ती जागा - ______
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
आश्वासक चित्र
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
क्र. | मुद्दे | आश्वासक चित्र |
1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
2. | कवितेचा विषय - | |
3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. झरोक - ______ |
ii. कसब - ______ |