Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
डी.एन.ए फिंगर प्रिटिंगचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा.
Answer in Brief
Solution
डी. एन. ए. फिंगर प्रिंटिंग हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. याच्या साहाय्याने एखादचा व्यक्तीच्या डी. एन. ए. च्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. या तंत्राचा वापर, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी केला जातो.एखादया बेवारस मृत व्यक्तीची अचूक ओळख पटवण्यासाठी देखील या तंत्राचा वापर करतात. पालकत्व सिद्ध करण्यासाठी माता, पिता आणि बालक यांचे डी. एन. ए. चे आराखडे जुळले पाहिजेत. ज्या वेळी असा संभ्रम असेल तेव्हा आपला वंश ओळखण्यासाठी डी. एन. ए. फिंगर प्रिंटिंगचा उपयोग करतात. उत्खननात जीर्ण अवशेष मिळाल्यास त्यांचाही अभ्यास या तंत्राने करतात.
shaalaa.com
डीऑक्सीराइबोन्यूक्लीटाइड आम्ल (डी. एन. ए.) आणि त्याची रचना
Is there an error in this question or solution?