Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
भारताचे परराष्ट्र धोरण
Explain
Solution
१९४७ साली भारताला स्वतंत्र मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली.
- भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमधील कलम ५१ नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे.
- त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे.
- अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झाले आहे.
shaalaa.com
भारताचे परराष्ट्र धोरण
Is there an error in this question or solution?