Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रीय पक्ष
Short Note
Solution
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना 'राष्ट्रीय पक्ष' असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत.
- किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
- आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
- किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे भारतातील राष्ट्रीय पक्ष आहेत.
shaalaa.com
राष्ट्रीय पक्ष
Is there an error in this question or solution?
Chapter 2.3: राजकीय पक्ष - संकल्पना स्पष्ट करा