Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे.
Short Note
Solution
- बाळ ज. पंडित हे उत्तम क्रिकेट समालोचक होते. पूर्वी ते आकाशवाणीवरून क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन करत असत.
- समालोचन करत असता बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास व खेळाशी संबंधित आठवणी आणि आधीचे विक्रम यांची देखील माहिती देत असत.
- पंडित यांना खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन हे रंजक होत असे. हे समालोचन व धावते वर्णन ऐकण्याकरता लोक अतिशय उत्सुक असत.
shaalaa.com
खेळ आणि व्यावसायिक संधी
Is there an error in this question or solution?