Advertisements
Advertisements
Question
उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
पुस्तकाकडे केवळ कागदांवर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो. त्यांना स्वत:चं व्यक्तिमत्त्व असतं. पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची; संवाद साधण्याची! एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं, की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं. परमेश्वरानं आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे; पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकंच देऊ शकतात. शिवकथा वाचायला लागलो, की त्यांच्या शब्दाशब्दांतून इतिहास जिवंत होतो. जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूपं पाहत पशुपक्षी, प्राण्यांशी संवाद साधतो, विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो, तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभांडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतंच आणि जाणिवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून, तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्त्वे केवळ पुस्तकेच देतात म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो. त्याच्याशी नातं जोडायलाच हवं. |
- पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती?
- पुस्तकांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे?
- 'थोरामोठ्यांची चरित्रे' आणि 'विनोदी कथा' वाचनाचा तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो, असे लेखकाला वाटते?
- पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
- पुस्तकांची वैशिष्ट्ये:
- पुस्तकांनाही जीव असतो.
- त्यांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते.
- ती आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात.
- ती आपले आयुष्य संपन्न आणि श्रीमंत करतात.
- ती ज्ञानभांडार आहेत आणि मनोरंजन तसेच प्रगल्भता वाढवतात.
- लेखकाने पुस्तकांना "प्रकाशवाटा दाखवणारा मित्र" अशी उपमा दिली आहे.
- थोरामोठ्यांची चरित्रे वाचल्यावर प्रतिकूल परिस्थिती आणि थोर व्यक्तींची कर्तृत्वशाली कार्ये आपल्याला अंतर्मुख करतात. विनोदी कथा वाचल्यावर आपण भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात हरवून जातो.
- पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे:
- पुस्तकांशी मैत्री केल्याने आपले ज्ञान वाढते.
- आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल शिकतो आणि नवीन गोष्टी समजून घेतो.
- पुस्तकांमुळे आपल्याला इतिहास, विज्ञान, कल्पनारम्य कथा आणि थोर व्यक्तींच्या जीवनाची माहिती मिळते.
- आपले विचार प्रगल्भ होतात आणि आपण जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो.
- पुस्तके आपले मनोरंजन करतात आणि आपल्याला एकटेपणाची जाणीव होत नाही.